एकट्याने थाळी संपवा आणि 2 लाखांची नवी कोरी बुलेट सोबत घेऊन जा…

पुणे | आपल्या हॉटेलचे जेवण आणि नाव चर्चेत यावे म्हणून काही लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत असतात. अशीच एक क्लृप्ती पुण्यातील शिवराज हॉटेल यांनी सुद्धा वापरली आहे. एखाद्या ग्राहकाने जर एका तासात बुलेट थाळी संपवली तर शिवराज हॉटेल त्या ग्राहकाला क्लासिक 350 या प्रकारातील बुलेट ही गाडी अगदी मोफत देणार आहेत.

कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल आणि व्यावसायिकांचे धंदे बुडाले किव्वा आर्थिक अडचणीमध्ये सापडले. अशीच अडचण ही पुण्यातील शिवराज रेस्टॉरंट यांना सुद्धा आली. आलेल्या संकटांमुळे आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काहीतरी करावे लागेल असे माहित असताना हॉटेलच्या व्यवस्थापनाने अश्या प्रकारची योजना काढली आहे.

बुलेट थाळीमध्ये 4 किलो मटणापासून 12 प्रकारचे पदार्थ, यामध्ये सुरमई, फ्राय फिश, चिकन तंदुरी, सुके मटण, ताजे ग्रे मटण, मटण मसाला यांचा समावेश आहे. या थाळीची किंमत 2500 असून अश्या प्रकारच्या 65 थाळ्या दिवसभरात या रेस्टॉरंट मधून विकल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like