सीरम इन्स्टिट्यूटला आग लागली की लावली?? ; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाला कोरोना लस उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी भीषण आग लागली. जवळपास दोन तासांपासून ही आग धुमसत आहे. सुदैवाने या इमारतीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचं (Covishield vaccine) काम चालत नव्हतं. दरम्यान ही आग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यानच त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे”

त्याआधी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबात घातपाताचा संशय व्यक्त केला होता.हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, अशी माहिती भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment