पुण्याच्या या पठ्ठ्यानं बनवलाय चक्क सोन्याचा मास्क; किंमत २.९ लाख रुपये

पुणे । सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. आता संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून कामकाजाला सुरुवात केली जात आहे. मात्र हे करत असताना सामाजिक अलगावचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. आता आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार लोक मास्क खरेदी करत आहेत. पण पुण्यात एका इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. पुण्यातील पिंपरी … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन

पुणे । पिंपरी-चिंचवड मनपा चे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. साने यांच्या निधनामुळं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी … Read more

अबब!! पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली २५ हजाराच्या घरात; ७९० रुग्णांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यात आज एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ हजार ५५८ झाली आहे. आज पर्यंत पुणे विभागात एकूण १ लाख ८३ हजार ७९८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १ लाख ७० हजार ६९१ इतके अहवाल आले आहेत. ४१०७ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. विभागातील १ लाख ४९ हजार ६५२ नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले … Read more

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपासून होणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा संचारबंदीमुळे शाळा महाविद्यालये उशिरा सुरु होणार आहेत. अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु होण्याची वाट बरेच विद्यार्थी आणि पालक बघत होते. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठीचा … Read more

Digital Surgical Strike | केंद्र सरकारने बंदी घातलेले ५९ चायनीज ऍप कोणते? 

भारतात ५९ चायनीज ऍप वर बंदी घालण्यात आली आहे. हे ऍप नक्की कोणते?

गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक … Read more

भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगेंना कोरोनाची बाधा; फडणवीसांच्या दौऱ्यात झाले होते सामील

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असताना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत माहिती दिली. काल रविवारी २८ जूनला आमदार लांडगे यांच्या प्रकृतीमध्ये बदल … Read more

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस जीप एक्स्प्रेस वेवर पलटून अपघात

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) प्रवास करत असताना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. यावेळी शरद पवार Sharad Pawar यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक गाडी जवळपास पलटी झाली. त्यामुळे थोड्या वेळासाठी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार … Read more

संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने पंढरपुरात न्याव्यात – राम सातपुते 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशी काहीच दिवसांवर आली आहे. यावर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मानाच्या पालख्या हेलिकॅप्टर अथवा विमानातून नेता येतील का याची चाचपणी सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. तर आषाढी एकादशी दिवशी संत भेटीची परंपरा अबाधित ठेवीत मानाच्या पालख्या … Read more

प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी … Read more