आषाढी वारी बाबत अजित पवारांची बैठक; विश्वस्तांनी ठेवले प्रशासनासमोर ‘हे’ तीन पर्याय

पंढरपूर प्रतिनिधी । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव आता सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरदेखील पडत आहे. आषाढी एकादशी वारी समोर कोरोनामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा एक बैठक घेतली असून यात वारी बाबतचा निर्णय ३१ मे रोजी … Read more

भय कोरोनाचे! टेस्ट रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाने केली आत्महत्या

पुणे । कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या पुण्यात आज धक्कादायक घटना घडली. आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने एका २४ वर्षीय रुग्णाने आज येथील एका रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.पुणे शहरातील बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात काल (१४ मे) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more

श्रमिकांच्या घरवापसीसाठी पुणे विभागातून उद्या एकाच दिवशी ७ ट्रेन रवाना होणार

पुणे । लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमधून मजुरांनी आपापल्या गावची वाट धरली असून पुण्यातून उद्या एकाच दिवशी सात श्रमिक विशेष गाड्या रवाना होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या गाड्यांपर्यंत मजुरांना आणण्याची चोख व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनमुळे पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या ३५ हजार १६३ श्रमिकांना २८ रेल्वे गाड्यांतून आपापल्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १५) आणखी … Read more

लॉकडाऊनमधील ‘या’ लग्नाने चंद्रकांतदादांना माणसांत आणि जमिनीवर आणलं

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील लॉकडाऊनमध्ये एका साध्या विवाहसोहळ्यास हजेरी लावली.

गुड न्यूज ! ‘कोरोना अँटिबॉडीचा’ शोध लावणारी पहिली टेस्ट किट पुण्यात तयार

पुणे | गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भारत कोरोना व्हायरस या विषाणूजन्य आजाराशी दोन हात करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अस असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने पहिली स्वदेशी कोरोना अँटिबॉडी किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

सोमवारपासून गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सुरू; असे नोंदवा नाव

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक, विद्यार्थी गेल्या मागील काही दिवसांपासून अडकले आहेत. अशा अडकून पडलेल्यांना लोकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून … Read more

‘प्रोपगंडा’ – लोकांच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं पुस्तक

“अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” ही संकल्पना कशी सुचली? राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती? या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला? आण्णा हजारेंचं आंदोलन देशव्यापी कसं झालं? त्यानंतर आण्णा प्रसिद्धीमाध्यमांपासून कसे दूर फेकले गेले? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या पुस्तकात केलाय.

पुणे अग्निशमन दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कमर्चारी यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्यांनतर आता अग्निशमन दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार पुणे अग्निशमन दलात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे … Read more

रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आज पहिली बस होणार रवाना

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स चे … Read more

सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत.