मुंबई । राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल २ हजार ९४० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत आज सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत राज्यात एकूण ४४ हजार ५८२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
Maharashtra records highest spike of 2940 COVID-19 cases in a single day today, taking the total number of positive cases in the state to 44,582: State Health Department pic.twitter.com/75H7Ha54PP
— ANI (@ANI) May 22, 2020
दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनाने ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ८५७ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४४ हजार ५८२ इतकी झाली असून त्यातील ३० हजार ४७४ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राज्यात आज २९४० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; रुग्णांची एकूण संख्या आता झाली ४४५८२. आज नवीन ८५७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १२५८३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३०४७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती https://t.co/T3qYrE63TN
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 22, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”