मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगात वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ होत आहे. राज्यात काल १२२ कोरोनाबाधित रुग्ण दगावले असतानाच आज पुन्हा१३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २८४९वर गेली आहे. आज दगावलेल्या रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक ५४ तर ठाण्यात ३० रुग्ण दगावले आहेत. तर आज २४३६ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ८० हजार २२९ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोरची चिंता वाढली आहे.
राज्यात आज सर्वाधिक ठाणे परिमंडळात एकूण ९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मुंबईतील ५४, ठाण्यातील ३०, वसई-विरार आणि भिवंडीतील प्रत्येकी एका आणि कल्याण-डोंबिवलीतील ७ रुग्णांचा समावेश आहे. तर नाशिक परिमंडळात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगावमधील १४, मालेगाव ८ आणि नाशिकमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. पुणे परिमंडळात १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून त्यात पुण्यातील १४ आणि सोलापुरातील दोघांचा समावेश आहे. रत्नागिरीत ५ आणि औरंगाबादमध्ये एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्यात आज १४७५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३५ हाजर १५६ झाली आहे. राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ८० हजार २२९ झाली असून राज्यात एकूण ४२ हजार २१५ करोना रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”