मुंबई | राज्यात आज 4841 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 147741 अशी झाली आहे. आज नवीन 3661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63342 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आता कोरोना व्हायरसपासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी विविध रुग्णालयांतून ३ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८४४ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 4841कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 147741 अशी झाली आहे. आज नवीन 3661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63342 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 25, 2020
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००), नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
दरम्यान, संपूर्ण मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता तब्बल ३९ दिवसांवर पोहोचला आहे. हा कालावधी ५० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले असून, त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना वाढवल्या आहेत. तसेच मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन आता १.८१ टक्के इतका झाला आहे.