हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. शाळांना शासनाने ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दहावी निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालासंदर्भात शासन निर्णयानुसार गुण नोंदविण्यात येत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तुनिष्ठ असायला हवा अशा सूचना शाळांना दिलया आहेत. निकालाच्या प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे वस्तुनिष्ठपणे निकाल जाहीर करावा अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आलया आहेत. मूल्यमापन पद्धतीचा, नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई होणार आहे. मूल्यमापनात फेरफार झालेल्या शाळांची मान्यता रद्द होणार आहे किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक बोर्डाकडून काढून घेण्यात येणार आहेत .
To deliver a fair & objective assessment, all school leaders must read the procedures laid down carefully & also ensure that all stakeholders have clearly understood their roles & responsibilities.#SSC #BoardExams #InternalAssessment #timetable pic.twitter.com/r6BYKPC26x
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 9, 2021
दहावीचा निकाल लावताना ‘या’ पद्धतीचा अवलंब
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी आणि 10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होईल, असं म्हटलं होतं.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.