ठाणे । मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात माणूसकीला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आले आहे. आपल्या पोटच्या मुलीवर पित्याने आणि तिने ज्याच्यावर विश्वास टाकला, त्या प्रियकराने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सकाळी दोन्ही आरोपींना अटक केली. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
३ दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे पोलिसांना एक मृत भ्रूण सापडले. या प्रकरणाची चौकशी करताना, ते मृत भ्रूण पीडित मुलीचे असल्याचे समजले. पोलीस चौकशीत पीडित तरुणीने, माझ्यावर वडिलांनी आणि प्रियकराने माझ्यावर अनेकवेळा बलात्कार केला, त्यातून मी गर्भवती राहिले असे सांगितले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुरव यांनी दिली.
पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब आधी पनवेल येथे रहात होते. पीडित तरुणीची प्रियकराबरोबर पनवेलमध्ये असताना ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. ते वाशिंदला रहायला गेले. पण तिथेही मुलगी तिच्या प्रियकराला भेटतच होती असे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणीच्या जबानीवरुन तिचे वडिल आणि प्रियकर दोघांना पोलिसांनी अटक करुन, बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तपासाचा पुढील भाग म्हणून दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”