मुंबई प्रतिनिधी । निवडणुकीच्या काळात मतदारांची मने जिकंण्यासाठी उमेदवार वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. मात्र, असाच काहीसा प्रयन्त करत असताना नातवाला आजोबांच्या विचारांचा विसर पडावा हे आश्चर्यच आहे. मुंबई स्थित दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चक्क लुंगी घातल्याचा विडिओ वायरल झाला आहे. ७० च्या दशकात मराठी माणसांच्या हितासाठी दाक्षिणात्य विरोधी भूमिका घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ अशी ऐतिहासिक घोषणा दिली होती. परंतु आता वरळीतून निवडणूक लढवणारे लुंगीधारी आदित्य ठाकरे बहुभाषिक राजकारणाचा नारा देताना दिसत आहे.
आदित्य यांचा ‘लूंगी’ विडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यावर नेटीझन्स जुनिअर ठाकरेंवर चांगलेच तुटून पडले आहेत. मराठी माणसाच्या हितासाठी एकेकाळी बाळासाहेबांनी आंदोलन केले होते, त्याचा खुद्द नातवाला विसर पडला आहे अशी चर्चा सोशल मीडियावर आता होत आहे. सोबतच शिवसेनेना आपला राजकीय अजेंडा बदलत आहे. शिवसेना ‘मराठी माणूस’ या आपल्या मूळ राजकीय मुद्याला मागे टाकत नव्या राजकीय वाटा धुंडाळत आहे. यांसारख्या अनेक चर्चाना राजकीय वर्तुळात आता उधाण आले आहे.
तेव्हा शिवसेनेचे उत्तराधिकारी समजले जाणारे आदित्य ठाकरे यांचे लुंगी प्रकरण भविष्यात शिवसेनेच्या राजकारणाची नवी दिशा तर ठरवणार नाही न? या प्रश्नाच उत्तर येणाऱ्या काळातच मिळणार आहे.