हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी – सुलतानी संकटाला तोंड दिले, लातूर च्या भूकंपासरख्या अत्यंत मोठ्या संकटाला देखील तोंड दिलं आहे. पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहेत. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की,” असं जयंत पाटील यावेळी म्हणाले
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं अभिनंदन केले. आज कोरोनाची महामारी असताना तब्बल 1100 बेड ची व्यवस्था असलेलं कोव्हीड सेंटर उभारण्याचे काम आमचे आमदार निलेश लंके यांनी केलं. येवडच नव्हे तर 24 तास त्यांनी त्या कोव्हीड सेंटरला वाहून घेतलं आहे. असे जयंत पाटील यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.




