कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड पालिका व पोलिस यांचे कडुन होत असलेल्या गणेश विसर्जनाची पाहणी केली शंभूराज देसाई यांनी कराड शहरातील पालिकेने संकलित केलेल्या गणेश मुर्ती चे पुजन करुन स्वता बोटीतुन जाऊन संगमावर गणेश मुर्ती चे विसर्जन केले.
दरवर्षी हजारो कराडकर नागरिक प्रितीसंगमवर घरगुती गणेश विसर्जन करतात मात्र कोरोना पार्श्वभूमीवर कराड पालिका व पोलिसांनी प्रितीसंगमावर विसर्जनास बंदी केली असुन कराड पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन मुर्ती संकलित करुन प्रितीसंगमवर विसर्जन साठी घेऊन येत आहेत चारशे पालिका कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हजारो मुर्ती चे विधीवत विसर्जन होत आहे. कराड कर नागरिकांनी पालिकेकडे मुर्ती विसर्जनासाठी दिल्याबद्दल व पोलिस व पालिकेने अतिशय चांगले नियोजन केलेबदल शंभुराज देसाईं यांनी समाधान व्यक्त केले.
आज कराडच्या प्रितीसंगमावर एक ही कराडकर नागरिक गणेश विसर्जनासाठी आलयाचे दिसले नाही. अनंत चतुर्दशी ला विसर्जन साठी फुललेला प्रिति संगम घाट आज मोकळा दिसत होता विसर्जनासाठी शहरातील नागरिकांनी सर्वच गणेशमुर्ती पालिकेकडे सुपुर्त केलया आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’