MahaRERA : महारेरा घेणार राज्यातील 5,260 रिअल इस्टेट एजंटांसाठी 5वी परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MahaRERA : महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी (MahaRERA) म्हणजेच महरेरा घर घेणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील असते. म्हणूनच अलीकडेच महरेरा कडून रियल इस्टेट एजंट्सची पात्रता परीक्षा घेतली जाते. या पात्रता परीक्षेत पास झालेल्या एजंटनाच व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते. आता महरेरा कडून 5,260 रिअल इस्टेट ची परीक्षा घेतली जाणार आहे. ही महरेरा कडून घेतली जाणारी पाचवी परीक्षा असणार आहे. ही परीक्षा 29 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

पुण्यातील 1,533 एजंट देणार परीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार 5,260 उमेदवारांपैकी 3,081 मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर), 1,533 पुण्यातील, 518 नागपूरचे आहेत, असे महारेराने एका निवेदनात म्हटले आहे. महारेरा नुसार, आत्तापर्यंत चार बॅच परीक्षेला बसले आहेत आणि 9,295 रिअल इस्टेट एजंट्सनी ती पास केली आहे.
महारेराने जानेवारी 2023 मध्ये रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण घेणे आणि नोंदणीचे विहित प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले होते. असे करण्यात अयशस्वी झाल्यास महारेरा अशा रिअल इस्टेट एजंटची नोंदणी निलंबित करेल असे सांगण्यात आले होते.

महाराष्ट्रात 47,000 एजंट नोंदणीकृत

संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 47,000 एजंट नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 13,785 एजंटची नोंदणी नूतनीकरण न केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणन आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झालेल्या 20,000 हून अधिक एजंटची नोंदणी निलंबित केली होती.
“त्यांना रिअल इस्टेट क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी अनिवार्य आवश्यकतांचे पालन करावे लागेल. सुरू केलेल्या कारवाईमुळे, आगामी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या मागील आवृत्तीत सुमारे 1,700 वरून 5,000 हून अधिक झाली आहे,” महारेरा एका निवेदनात म्हटले आहे.

“रिअल इस्टेट क्षेत्रात, ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे एजंट्सना RERA कायद्यातील तरतुदींची माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे महारेराने एजंटांसाठी हे अनिवार्य केले आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करा असे महरेरा कडून सांगण्यात आले आहे.