औरंगाबाद | महाशिवरात्री निमित्त खाद्य पदार्थांची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. त्यामुळेच बाजारात उपवासाच्या पदार्थांची मोठया प्रमाणात आवक झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने रताळे, केळी, बटाटे, खजूर, शेंगदाणे, शाबुदाना, भगर व फळेदेखील आहेत. खास महाशिवरात्रीसाठी रताळांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन भाजी मंडईत रताळ्यांची प्रचंड आवक आहे. उद्या पासून औरंगाबादेत अंशतः लॉक डाऊन लागणार असल्याने नागरिकांनी आजच खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी केली होती.
चवीला काहिसे गोड असलेल्या रताळ्यांना उपवासाच्या पदार्थांमध्ये स्थानअसल्यामुळे महाशिवरात्री निमित्ताने त्यास मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये प्रती किलो दराने त्यांची विक्री होत आहे.जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रताळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते मात्र कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जाधवमंडी 8 दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.यामुळे बाजार समितीत रताळ्याची आवाक झाली नाही,त्याबरोबच केळी, बटाटे यांची मागणीही वाढल्याचे दिसून आले.
उपवास निमित्ताने साबुदाणा, शेंगदाणे, भगर यासह उपवासाचे तयार पीठ यास मागणी वाढली आहे. साबुदाणा प्रती किलो ६० ते ६५ रुपये, शेंगदाणे १२० रुपयांच्या घरात आहे.
उपवास निमित्ताने केळीला जास्त मागणी असून भावही काहिसे वधारले आहे. ३० ते ५० रुपये डझन या भावाने त्याची विक्री होत असून यासह दही, खजूर, टरबूज, सफरचंद यासह अन्य पदार्थांची मागणी असल्याचे दिसून आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.