हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी हे कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र असून 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र तुषार गांधी कोल्हापुरला येण्यास निघाले आहेत.
Arun Gandhi, author and a grandson of Mahatma Gandhi, passed away today. He was son of Manilal and father of Tushar. My condolences.
— jatindesai (@jatindes) May 2, 2023
अरुण गांधी यांनी आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. एक लेखक म्हणून अरुण गांधी यांची ओळख होती. त्यांनी काही पुस्तके लिहिली असून त्यापैकी ‘द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. अरुण गांधी 1987 मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी Christian Brothers विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली आहे