महाविकास आघाडीने ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले : एकनाथ बागडी

कराड येथे भाजपा ओबीसी संघटनेकडून प्रातांधिकाऱ्यांना निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवेसना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने वेळीच इंम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर ओबीसींवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे आम्ही राज्यभर आज महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करत असल्याचे भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी सांगितले.

कराड येथील दत्त चाैकात शिवाजी महाराज याच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, सरचिटणीस प्रमोद शिंदे, सुदर्शन पाटसकर, मानसिंग कदम यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दत्त चाैक येथे निषेध व्यक्त केल्यानंतर प्रातांधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारचा ओबीसी समाजातर्फे व भाजपच्या ओबीसी मोर्चाच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत. ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व सरकाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. यावेळी ओबीसी मोर्चा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांनाही निषेध केला.

You might also like