नागपूर । शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
‘जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवायच्या नाहीत, असा एसपी आणि कलेक्टरांना अलिखित आदेश देण्यात आलेला आहे. आमचे कार्यकर्ते बिनधास्त गाड्या चालवतील, असा कारभार चालला आहे. सर्वांनी जिल्हे वाटून घेतले आहेत. अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामधून मोठी कमाई केली जात आहे,’ असे गंभीरआरोप बावनकुळे यांनी केले आहेत.
दरम्यान, बावनकुळे यांच्या आरोपाला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना सत्तेत असताना चालवलेल्या अवैध धंद्यांची आठवण येत असावी. बावनकुळे यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत. तसेच असे आरोप करताना भान ठेवावं, असा कडक इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
पदवीधर निवडणुक: भाजपाला लागलं नाराजीचं ग्रहण! आणखी एक मित्रपक्ष दुखावल्याने वाढली डोकेदुखी
वाचा सविस्तर-👉 https://t.co/sYsK8gzeGw@ChDadaPatil @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #HelloMaharashtran #padvidhar— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 18, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in