हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनी काहीना काही तरी कारणांनी नेहमी चर्चेत असतो आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो म्हणजे धोनीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेतल्याने आणि त्यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे. या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला असून धोनी भाजपमध्ये प्रवेश तर करणार नाही ना? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.
नुकतीच इंडिया सिमेंट्स या कंपनीला 75 वर्ष पूर्ण झाले. या निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमामध्ये महेंद्र सिंग धोनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन्ही मान्यवर उपस्थिती होते. यावेळी दोघांनी काहीकाळ एकमेकांशी गप्पाही मारल्या.
यावेळी दोघांनी हस्तांदोलन केले. भारतीय क्रिकेट नियमन मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीची ही कंपनी आहे. एन. श्रीनिवासन हेच इंडियन प्रमियर लीगमधील चेन्नईच्या संघाचे मालक आहेत. धोनी आणि श्रीनिवासन यांचे फार घनिष्ट संबंध असल्याने धोनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता.
MS Dhoni meets India's Home Minister, Amit Shah. pic.twitter.com/aVqeaJZTvP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2022
सध्या आयपीएलमधील खेळाडूंची निवड करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीचा लिलाव होणार आहे. आतापासूनच धोनीची आणि सीएसकेची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. या दरम्यान आता धोनीच्या या व्हायरल झालेल्या फोटोमुळे तो राजकीय पक्षात प्रवेश करणार का? कि पुन्हा क्रिकेट खेळणार अशा अनेक चर्चा केल्या जाऊ लागल्या आहेत.