कांता गॅंगसह 38 जणांवर ‘मोक्का’ कारवाई करा, अन्यथा सहकुटुंब 26 जानेवारीला आत्मदहन करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

काही दिवसांपूर्वी सातारा येथील वाढे चौकात दुकानांच्या भीषण आग लागण्याची घटना घडली होती. दरम्यान, आता येथील शिवदास कुशन जेके बॅटरी टायर्स अँड पंक्चर दुकानातील साहित्य चोरी, विक्री मारहाण प्रकरणी खेड ग्रामपंचायतीचे सदस्य कांता उर्फ कांतीलाल कांबळे यांच्यासह 38 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी जर कडक कारवाई केली नाही तर 26 जानेवारीला सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करणार, असा इशारा तक्रारदार महेश शिवदास यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुकानातील साहित्य चोरून मारहाण केल्याप्रकरणी सातारा येथील महेश शिवदास यांनी पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात खेड ग्रामपंचायतीचे सदस्य कांता उर्फ कांतीलाल कांबळे यांच्यासह 38 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी तक्रारदार शिवदास यांनी केली आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवदास यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, प्रतापसिंह नगरात दुसरा दत्ता जाधव उदयास येत आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त केला नाही तर भविष्यात सामान्य जनतेसह पोलीस खात्यालाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. पोलीस अधीक्षकांनी मोक्काखाली अशा प्रवृत्तींना आळा घालावा. त्यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही तर 26 जानेवारीला सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करणार आहोत.