10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC अंतर्गत 11,409 जागांवर मेगाभरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग येथे रिक्त पदांच्या (SSC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत  मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल), स्टाफ हवालदार (CBIC & CBN) पदांच्या तब्बल 11409 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग

भरती प्रकार – सरकारी

पद संख्या – 11,409 पदे

भरले जाणारे पद –

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – 10,880 पदे
हवालदार (CBIC & CBN) – 529 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
हवालदार (CBIC & CBN) – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा –

जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹100/-

SC/ST – फि नाही

PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

सर्वप्रथम कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY