Mahila Samman Savings Certificate : महिलांनो, ‘या’ योजनेच्या माध्यमातून दर 3 महिन्यांनी 27,845 रुपये मिळवा; कसे ते पहा

Mahila Samman Savings Certificate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्य निर्वाह निधी ,सुकन्या समृद्धी योजनेनंतर भारत सरकारने महिलांसाठी गुंवणूकीच्या उद्देशाने Mahila Samman Savings Certificate योजना अंमलात आणली आहे . ज्या योजने अंतर्गत महिला दररोज 267 रुपये गुंतवून दर 3 महिन्यांनी 27,845 रुपये मिळवू शकतील. भारतीय पोस्ट खात्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या ह्या योजनेत महिला स्वतःसाठी किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने, तिच्या पालकांद्वारे पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC )खाते उघडू शकते.

पोस्ट ऑफिसमध्ये MSSC खाते उघडण्यासाठी किमान पैसे 1000 रुपये आहेत आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. मात्र, यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवता येतात. एका MSSC खात्यात किंवा एकाहून अधिक MSSC खात्यांमध्ये 2 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. परंतु महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या सर्व MSSC खात्यांमध्ये जमा केलेले एकूण पैसे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावेत.

महिला सन्मान योजनेतील महत्वाचा नियम –

एक खातेदार महिला (MSSC ) एमएसएससी योजनेअंतर्गत अनेक खाते उघडू शकते . त्यामुळे रोज काही पैसे वाचवून या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. पहिले खाते उघडल्यानंतर दुसरे खाते उघडण्यात सुमारे तीन महिन्यांचे अंतर असावे. म्हणजेच आज एक खाते उघडले तर पुढील खाते ३ महिन्यांनंतर उघडता येते.

3 महिन्यांनी 27,845 रुपये कसे मिळतील?

या योजनेत सामील झालेल्या महिलांनी व अल्पवयीन मुलींनी दररोज फक्त 267 रुपयांची बचत करून गुंतवणूक केली वाचवले तर महिन्याच्या शेवटी (30 दिवसांनंतर) त्यांच्याकडे 8010 रुपये जमा होतील.म्हणजे तीन महिन्यांच्या शेवटी त्यांच्याकडे एकूण पैसे 24,030 रुपये जमा होतील असतील. महिला नवीन MSSC खात्यात तीन महिन्यांनंतर रु. 24000 गुंतवू शकता, ज्यावर 7.5% व्याज मिळेल आणि 2 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतर त्यांना सुमारे रु. 27,845 मिळतील. अशा प्रकारे, MSSC खात्यात प्रत्येक तिमाहीत 24,000 रुपये गुंतवून महिला वा अल्पवयीन मुली पालकांद्वारे 2 वर्षांसाठी दर तीन महिन्यांच्या अंतराने अंदाजे 27,845 रुपये काढू शकतील.

MSSC योजनेत दर तीन महिन्यांनी व्याज मिळेल . व्याज दर तीन महिन्यांनी गुंतवणूकदार महिला वा मुलींच्या खात्यात जमा केले जातात परंतु खाते बंद झाल्यानंतरच त्याचे पेमेंट केले जाते. MSSC खातेधारकांना खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढण्याची परवानगी आहे.