Mahindra Thar : आता मिळणार अगदी स्वस्तात; गाडीच्या फिचर्समध्येही होणार बदल

Mahindra Thar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिंद्रा थार (Mahindra Thar) म्हणलं की प्रत्येकाच्या मनात येते ते म्हणजे मजबूत इंजिन आणि खास स्टाइल… तरुणांमध्ये ही एसयूव्ही खूप लोकप्रिय आहे. परंतु या गाडीची किंमत जास्त असल्यामुळे इच्छा असूनही चाहते ही गाडी खरेदी करू शकत नाहीत. परंतु तुम्हांलाही ही गाडी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. महिंद्रा लवकरच थार एसयूव्हीचे स्वस्त मॉडेल लॉन्च करणार आहे. हे नवं मॉडेल सर्वसामान्यांना परवडणारं असेल आणि यामध्ये अनेक बदल सुद्धा आपल्याला पहायला मिळतील.

Mahindra Thar

इंजिन – (Mahindra Thar)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा थार लवकरच नवीन (Mahindra Thar) पॉवरट्रेन म्हणून सादर केली जाईल. कंपनी आता ही SUV नवीन 1.5-लीटर डिझेल इंजिनसह बाजारात आणण्याची तयारी करत आहे. हे इंजिन 116 Bhp आणि 300 Nm चे पीक टॉर्क आउटपुट देते. या परवडणाऱ्या नवीन थारमध्ये फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टीम असणार नाही. ही फक्त रियर-व्हील ड्राइव्ह असेल.

Mahindra Thar

फीचर्स –

टू-व्हील ड्राइव्ह व्हर्जनमध्ये पॉवर 15 bhp ने कमी होईल मात्र टॉर्क आउटपुट मध्ये कोणताही बदल होणार नाही. महिंद्राची ही (Mahindra Thar) नवीन टू-व्हील ड्राइव्ह थार फोर-व्हील ड्राइव्हपेक्षा वजनाने हलकी असेल, परंतु तिच्या परफॉर्मेंस मध्ये जास्त फरक असणार नाही. अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, महिंद्र थारमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी डीआरएल, अलॉय व्हील्स, हार्ड/सॉफ्ट रूफ टॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ISOFIX माउंट्ससह फॉरवर्ड-फेसिंग रिअर सीट्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.

Mahindra Thar

किंमत-

महिंद्राच्या या नव्या थारची किंमत किती (Mahindra Thar) असेल हे लॉन्च होण्याच्या आधीच सांगणं कठीण आहे. कंपनी कडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. महिंद्राची ही नवी थार जानेवारी मध्ये लॉन्च होण्याची शक्यता असून 10 लाखांच्या रेंजमध्ये ही गाडी बाजारात आणली जाऊ शकते. यापूर्वीच्या थारची किंमत 13.58 लाख ते 16.28 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

हे पण वाचा : 

 LookBack2022 : सर्वाधिक मायलेज देणाऱ्या SUV कार कोणत्या ठरल्या?

Range Rover Sport 2023 ची डिलिव्हरी सुरु; पहा फीचर्स आणि किंमत

Tata Nano : टाटा लाँच करणार नॅनोचं इलेक्ट्रिक माॅडेल; जाणुन घ्या

Volkswagen Tiguan Exclusive Edition भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत