Tata Nano : टाटा लाँच करणार नॅनोचं इलेक्ट्रिक माॅडेल; जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एप्रिल 2020 मध्ये भारतात BS6 नियम लागू करण्यात आला. यानंतर टाटाने नॅनो (tata nano) आणि सफारी स्टॉर्म बंद केली होती. यादरम्यान जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध झालेली टाटा नॅनो (tata nano) देशातील कार निर्मात्यासाठी विक्री निर्माण करण्यात अपयशी ठरली. यानंतर मे 2018 मध्ये या कारचे उत्पादन बंद करण्यात आले.

कंपनीचे काय म्हणणे आहे?
स्वदेशी ऑटोमेकर टाटा नॅनोला (tata nano) इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह पुन्हा लॉंच करण्यात येणार आहे. या कारमध्ये तुम्हाला टाटा नॅनो ईव्हीच्या अंडरपिनिंग, सस्पेंशन सेटअप आणि टायर्समध्ये लक्षणीय बदल पाहायला मिळतील. कंपनीने टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारबाबत अजून कोणती अधिकृत माहिती दिली नाही.

सध्या, टाटा कंपनी (tata nano) भारतात तीन EV कारची विक्री करते. Tigor EV, Xpres-T आणि Nexon EV टाटाने नुकतीच Tiago EV च्या किमती जाहीर केल्या आहेत. या कारची किंमत 8.49 लाख पासून 11.79 लाख रुपयांपर्यंत आहे. इलेक्ट्रिक हॅचबॅकची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे.

Tiago EV हि कार तीन चार्जिंग पर्यायांसह उपलब्ध आहे. 50kW DC फास्ट चार्जर (57 मिनिटांत 80 टक्के चार्ज), 7.2kW AC फास्ट चार्जर (2 तास 35 मिनिटे – 19.2kWh आणि 3 तास 35 मिनिटे – 24kWh) आणि 3.3kW होम चार्जर (100% चार्ज) 5 तास 5 मिनिटांत – 19.2kWh बॅटरी/ 6 तास 20 मिनिटे – 24kWh बॅटरी) चार्ज.

हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…