IndiGo ची जबरदस्त ऑफर ! वर्षाखेरीस लुटा फक्त ‘इतक्या’ पैशात हवाई सफरचा आनंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरत्या वर्षाला निरोप देण्याआठी अवघे पाच दिवस बाकी राहिले आहेत. या दिवसात अनेकजण आपली सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेरच्या देशात जाण्याचे नियोजन करतात. तुम्हीही जर बाहेर देशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंडिगोने अधिशय कमी पैशात तीन दिवस आणि अजूनही हवाई सफरची अनोखी ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर केवळ आजच्या दिवस आहे.

इंडिगो एअरलान्सने देशांतर्गत प्रवासासाठी 2 हजार 23 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 4 हजार 999 रुपयांपासून तिकीट सुरू केले आहेत. 15 जानेवारी ते 14 एप्रिल 2023 पर्यंत प्रवासासाठी तिकीट बुक करु शकतात. या योजनेचा मुळ उद्देश हा विमान प्रवास क्षेत्रास सुधार करण्याचा आहे.

आता अवघ्या पाच दिवसानंतर 2023 या नववर्षास सुरुवात होणार आहे. 290 विमानांच्या ताफ्यासह, दररोज 1 हजार 600 पेक्षा जास्त कंपनी विमान उड्डाणे चालवत आहे. इंडिगो 76 देशांतर्गत आणि 26 आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेतली जातात.

कधी करू शकतात प्रवास?

ग्लोबल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा ​​यांच्या मते, विमान वाहतूक क्षेत्रातील सुधारणाकरण्याच्या उद्देशाने व प्रवाशांना अधिक आनंद घेता यावा या हेतूने कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 2023 मध्ये प्रवेश करत आहोत. मोठ्या संख्येने लोक विमानाने प्रवास करत आहेत. म्हणूनच या सुट्टीच्या कालावधीत कंपनीकडून विमान वाहतूक क्षेत्रात चांगली सुधारणा करण्यात आली आहे.

हवाई सफरवर मिळतोय खास कॅशबॅक

हवाई सफरची देण्यात आलेली ही अनोखी ऑफर इंडिगोच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवरील विविध क्षेत्रांवरील नॉन-स्टॉप फ्लाइट्सवरच वैध आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक इंडिगोच्या भागीदार बँक HSBC कडून कॅशबॅक देखील घेऊ शकतात.