हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पारंपारिक पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांचं सातत्यानं नुकसान होताना दिसतं. हे नुकसान टाळण्यासाठी आता शेतकरी नवीन पिकाच्या शेतीकडे वळू लागले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की जर तुम्ही महोगनी वृक्षाची लागवड (Mahogani Farming) केली तर कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता. महोगनी हे सदाहरित वृक्ष मानले जाते. या झाडाच्या लाकडाला बाजारात नेहमीच चांगला भाव मिळतो. शेतकरी सध्या साग, चंदन, महोगनी या झाडांची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. त्यामुळे आता महोगनी झाडाची लागवड केली तर हे झाड शेतकऱ्यांना निश्चित फायदा मिळवून देईल. हे झाड तुम्हाला हेक्टरी 50 लाखाचे उत्पादन मिळवून देऊ शकते; असं कृषी तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे महोगनी वृक्ष लागवड करण्याकडे शेतकऱ्यांनी आपला कल वाढवावा.
महोगनी वृक्षाची वैशिष्ट्ये-
महोगनी सदाहरित झाड आहे.
हे झाड 200 फूट उंचीपर्यंत वाढू शकते.
याचे लाकूड लाल आणि तपकिरी रंगाचे असते.
महोगनीचे लाकूड पाण्याने खराब होत नाही. Mahogani Farming
या झाडाच्या लाकडाला बाजारात नेहमी चांगली किंमत मिळते.
कुठे कराल लागवड-
ज्या ठिकाणी जोरदार वाऱ्याचा धोका कमी असतो अशा ठिकाणी महोगनी वृक्षाची लागवड करणे फायद्याचे आहे.
ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होतो अशा जमिनीवर वृक्ष लागवड करता येऊ शकते.
या लागवडीमध्ये 3 ते 4 वर्ष आंतरिक पीक घेता येते
महोगनी वृक्षाच्या लाकडाचे फायदे Mahogani Farming –
महोगनीच्या लाकडाला बाजारात नेहमीच जास्त किंमत मिळते.
हे लाकूड अतिशय टिकाऊ समजले जाते.
जहाजे, दागिने, फर्निचर, प्लायवूड, सजावट आणि मुर्त्या बनवण्यासाठी या लाकडाचा वापर होतो.
या झाडाची फळे, पाने आणि साल यांचा औषधांमध्ये वापर होतो.