गुजरातमध्ये पुल कोसळून मोठा अपघात! 400 लोक पाण्यात पडल्याची शक्यता

cable bridge break
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पुल कोसळून (cable bridge break) मोठी दुर्घटना घडली आहे. हा पूल ज्यावेळी तुटला (cable bridge break) तेव्हा त्या ठिकाणी 400 लोक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूल कोसळल्याने किती लोक नदीत पडले याची माहिती सध्या तरी कळू शकलेली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली.

हाती आलेल्या माहितीनुसार हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना (cable bridge break) असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो सुरु करण्यात आला होता. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या अपघातानंतर केबल पुलाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मोरबी येथील अपघाताबाबत (cable bridge break) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून या अपघातातील लोकांच्या बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले आहे. तसेच परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्याचे पीएम मोदींकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!