राणा, फाना हवेच्या फुटान्यासारखे फोडून टाकतो, बच्चू कडूंची जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यात मोठया प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यातला वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार केला. 50 आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिले आहे. यानंतर आज पुन्हा एकदा बच्चू कडूंनी जाहीर सभेत अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले बच्चू कडू?
आज रात्री मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत रवी राणा व बच्चू कडू (bachchu kadu) यांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी अमरावतीच्या तिवसा येथे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली. या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांवर जोरदार टीका केली. राणा, फाना हवेच्या फुटान्यासारखे फोडून टाकतो, अशी टीका त्यांनी यावेळी केली. सात-आठ पक्ष जरी एकत्र आले तरी आमचा पराभव होऊ शकत नाही, असेसुद्धा बच्चू कडू यावेळी म्हणाले.

बच्चू कडूंनी दिला इशारा ?
बच्चू कडू (bachchu kadu) यांनी याआधीच रवी राणा यांना 1 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या आरोपांप्रकरणी पुरावा सादर करण्यास सांगितले आणि जर ते केले नाहीतर सात ते आठ आमदार आपल्या संपर्कात असून सरकारमधून बाहेर पडू असा इशारा बच्चू कडू (bachchu kadu) यांनी दिला होता.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय