दिवाळीच्या मुहूर्तावर बनवा मूगडाळीचा चविष्ट हलवा; घरी आलेल्या पाहुण्यांना करा खुश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हणल की आपल्याला पाहिले जिभेवर रेंगाळणारे फराळ आठवते. चकली, चिवडा, लाडू, कापण्या, करंज्या असे कित्येक पदार्थ आपण दिवाळीत बनवतो. परंतु या दिवाळीमध्ये तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना फराळ सोडून इतर गोडधोड पदार्थ ही खायला घालू शकता. यंदाच्या दिवाळीत तुम्ही जर मूगडाळीचा हलवा बनवला तर पाहूनच नाहीत तर तुमच्या घरातले देखील खुश होऊन जाते. चला तर मग जाणून घेऊयात मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा?

मूग डाळीचा हलवा बनवण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या की, तो चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित रित्या शिजला गेल्या पाहिजे. मुगडाळीचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात तुपाचा वापर करावा लागतो. तसेच हा हलवा मंद आचेवरच शिजवून घ्यावा लागतो. मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला जास्त सामग्री लागत नाही परंतु वेळ मात्र जातो.

मूगडाळ हलवा बनवण्यासाठी सामग्री

मुगडाळ
केशर
दुध
वेलची पावडर
बदामाचे काप
देशी तूप
साखर

कृती –

1) सर्वात प्रथम मूगडाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या त्यानंतर ही डाळ तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवा
2) तीन तासानंतर डाळीतील पाणी काढून टाका.
3) यानंतर मूग डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
4) वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये कोमट दूध घाला.
5) पुढे त्यामध्ये केसर टाका आणि थोडीशी वेलचीची पूड देखील टाका.
6) हे सर्व पदार्थ एकत्र करून घेतल्यानंतर ते बाजूला ठेवून द्या.
7) दुसऱ्या बाजूला एक खोलगट कढई घ्या.
8) या कढईमध्ये तूप घालून ते चांगले गरम करून घ्या.
9) तूप विरघळल्यानंतर त्यात बारीक वाटलेली मूग डाळीची पेस्ट घाला
10) ही पेस्ट तुपामध्ये सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या
11) ही डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेण्यासाठी 25 ते 20 मिनिटांचा कालावधी लागेल.
12) ही डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये एक कप दूध आणि एक कप कोमट पाणी घाला.
13) त्यानंतर पुन्हा सात ते आठ मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या.
14) यानंतर डाळीमध्ये एक वाटी साखर आणि वरून केसर वेलची पूड घाला.
15) यानंतर मूग डाळीचा हलवा आणखीन पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्या आणि गॅस बंद करा.

अशा पद्धतीने तुमचा मूग डाळीचा हलवा तयार असेल. हा हलवा तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवू शकता. मूग डाळीचा हलवा शरीरासाठी पौष्टिक देखील असल्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना खायला घालू शकता.