हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात साजरी केला जातो. पश्चिम बंगाल भागात देखील दिवाळी सणाला तितकेच महत्त्व देण्यात येते. त्यामुळे पश्चिम बंगाल भागात दिवाळीच्या काळामध्ये लवंग लतिका हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ बनवल्याशिवाय बंगाली लोकांची दिवाळी साजरी होत नाही. चवीला गोड असणारा आणि खुसखुशीत लागणारा लवंग लतिका पदार्थ बंगालची संस्कृती जपतो. आज आपण याच पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत.
लवंग लतिका पदार्थ साहित्य
१ वाटी मैदा
अर्धी वाटी बारीक रवा
पिठी साखर
खवा
चारोळ्या मूठभर
काजू तुकडा
२० ते २५ लवंगा
साखर २ वाटय़ा
पाणी व तळण्यासाठी तूप
बनवण्याची कृती
प्रथम रवा व मैदा चाळून घ्यावा. त्यात चिमूटभर मीठ घालून गरम तुपाचे मोहन घालावे. ते हाताने चांगले मिसळावे व त्यात कोमट पाणी घालून भिजवावे.
यानंतर पाव किलो खवा कुस्करून भाजून घ्यावा. तो थंड झाला की त्यात पिठीसाखर, चारोळे, काजू – बदाम, वेलची पूड घालून सारण तयार करावे.
रवा व मैदा याच्या पिठाच्या लिंबाएवढय़ा गोळ्या करून पुरीएवढे लाटावे. त्यात खव्याचे सारण भरून घेऊन पानाच्या विडय़ाप्रमाणे आकार करून त्याला प्रत्येकी २ लवंगा लावाव्यात.
अशा सर्व लतिका करून तुपात मध्यम आचेवर तळाव्यात. यानंतर २ वाटय़ा साखरेत १ वाटी पाणी घेऊन २ तारी पाक करावा. त्यात एक-एक करून सर्व लतिका टाकाव्यात व सर्व बाहेर काढून सुकवून घ्याव्यात व अशा प्रकारे सर्व लतिका तयार असतील.