बीड : शहरात शुक्रवारी खा. छ. संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अचानक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आयोजित कार्यक्रमात शिरले आणि संभाजीराजे भोसले यांना मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी संभाजीराजे चांगलेच भडकले आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना म्हणाले – ‘मला मुख्यमंत्री करा मगच मला प्रश्न विचारा’.
याबद्दल सविस्तर माहिती अशी कि, मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना संभाजीराजे म्हणाले की, ‘हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांना विचारा. पण ते तुम्हाला उत्तर देणार नाहीत. मला प्रश्न विचारायचा असेल तर या संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा. जर असे झाले तर नक्कीच बहुजांनाच्या हिताचे काम केल्याशिवाय राहणार नाही’.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी छ. संभाजी राजे राज्यभरात दौरा करत आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी समाजातील विविध घटकातील लोकांशी संवाद साधला. मात्र बीडच्या या घटनेने त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.