अकलूज प्रतिनिधी |भाजपच्या उमेदवाराला १ लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य देवू असा शब्द मोहिते पाटलांनी भाजप पक्ष श्रेष्ठींना दिला होता. तो शब्द पाळण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबाने कार्यकर्ते जोडीला घेवून जीवाचे रान केले. अंतिम निकाल येणे अद्याप बाकी असले तरी मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द खरा होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या उमेदवाराला माळशिरस मतदारसंघातून १ लाख ४५ हजार मतांचे मताधिक्य मिळेल असा नवा अंदाज व्यक्त केला आहे.अर्थात हा अंदाज मतदानात लोकांनी दिलेल्या प्रतिसादाच्या जोरावर व्यक्त करण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यात उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील असे दोन्ही गट भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिले. त्याच प्रमाणे माळशिरस तालुक्याच्या पाणी प्रश्नावर धवलसिंह मोहिते पाटील यांनी देखील भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने हि निवडणूक माळशिरस तालुक्यात तरी एकतर्फी झाली. त्यामुळे मोहिते पाटील यांचा शब्द खरा होण्याची शक्यता आहे.
संजय शिंदे राजकीय संन्यास घेणार का
राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे यांनी माळशिरस मधील मताधिक्याबद्दल एक वक्तव्य केले होते. माळशिरस मधून जर १ लाखाचे मताधिक्य भाजपला मिळाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल असे वक्तव्य संजय शिंदे यांनी केले होते. आता माळशिरस मधून भाजपला १ लाखांचे मताधिक्य जर मिळाले तर संजय शिंदे राजकीय संन्यास घेणार का ? हा प्रश्न आहेच. मात्र २३ मेपर्यत निकालाची वाट बघावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान
माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज
विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार
माढा : भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका : मराठा क्रांती मोर्चा
माढा : प्रचाराच्या शेवट दिवशी भाजपचे चार नेते करणार राष्ट्रवादीची नाकाबंदी