अर्थसंकल्पातील मोफत बस सेवा सातारा जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षापासून सुरू; मुलींसाठी मोफत बससेवेचा मलकापूर पॅटर्न राज्यभर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली बारावी पर्यंतच्या मुलींना मोफत बस सेवा ही सातारा जिल्ह्याच्या मलकापूरमध्ये गेली ९ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मलकापूर पॅटर्न राज्यानं स्वीकारल्याचा आनंदोत्सव नागरिकांनी साजरा केला.

मलकापूर (ता.कराड,जि. सातारा) येथे गेली ९ वर्षांपासून शालेय मुलींना मोफत प्रवास हा उपक्रम सुरू आहे. मलकापूरचा पॅटर्न राज्यानं आता स्वीकारला आहे. मलकापूर नगरपरिषद 2013 पासून शालेय मुलींना फ्री एसटी ही योजना स्वखर्चातून राबवत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली. अर्थमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना जाहीर केली. त्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची योजना जाहीर केली. मात्र, सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेत ही योजना ९ वर्षांपासून सुरु आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून शालेय मुलींना फ्री एसटीची सोय ही योजना सुरु कऱण्यात आली. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषद नऊ वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे. हा मलकापूर पॅटर्न राज्याने स्वीकारल्याचा आनंद मलकापूरवासीय व्यक्त करत आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही योजना साकरण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रमिलाताई चव्हाण कन्या सुरक्षा योजना या नावाने योजनेचा शुभारंभ झाला होता. ही योजना आज अखेर सुरू मलकापूर शहरात सुरु आहे. शालेय मुलीनां फ्री बसचा मलकापूर पॅटर्न राज्याने स्वीकारल्याचा आनंद मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group