हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक मनुवादी संस्था आहे. त्यांची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नव्हते. RSS ने नथुराम गोडसे याना उचकवून महात्मा गांधींची हत्या केली असं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेत केलं. खर्गे यांच्या विधानानंतर (Mallikarjun kharge on RSS) भाजप चांगलीच आक्रमक झाली असून सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जेपी नड्डा यांनी खर्गे यांचं हे विधान रेकॉर्डवरुन हटवण्याची मागणी केली.
सभागृहात नेमकं काय घडलं? Mallikarjun kharge on RSS
मल्लिकार्जुन खर्गे हे सभागृहात शिक्षण व्यवस्थेवर बोलत होते. गेल्या दहा वर्षांत आपली शिक्षण व्यवस्था भाजप-आरएसएसच्या लोकांनी काबीज केली आहे. विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक, एनसीईआरटी आणि सीबीएसई हे सर्व आरएसएसच्या नियंत्रणाखाली आहेत. चांगल्या विचारांच्या लोकांना तिथे स्थान नाही असं म्हणत खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल केला टॉवर प्रत्युत्तर देताना सभापती जगदीप धनखड यांनी विचारले की, कोणत्याही संस्थेचे सदस्य असणे गुन्हा आहे का? समजा एखादी व्यक्ती RSS चा सदस्य असेल तर तो स्वतःचा गुन्हा आहे का? देशासाठी काम करणारी, देशासाठी योगदान देणारी ही संस्था आहे. देशात आणि जगात प्रमाणित लोक आहेत, जे देशासाठी योगदान देत आहेत. जगातील सर्वात जास्त टॅलेंट तुम्ही त्याच्यात पाहू शकता असं धनखड यांनी म्हंटल.
धनखड यांच्या उत्तराला मल्लिकार्जुन खर्गे यांनीही प्रत्युत्तर देत आरएसएसवर हल्लाबोल (Mallikarjun kharge on RSS) केला, RSS ची विचारधारा देशासाठी घातक आहे. ते मनुवादी आहेत, त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नाही. अशा लोकांना तुम्ही इथे निवडले तर या देशातील शिक्षण व्यवस्थेचा उद्देश आणि संविधानाचा पराभव होईल असं खर्गे यांनी म्हंटल. खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, “खर्गे यांनी आरएसएसबद्दल जे काही म्हटले आहे ते अत्यंत बेजबाबदार विधान आहे आणि ते काढून टाकले पाहिजे. त्यांना संघटनांबद्दल थोडीशीही माहिती नाही.”
मात्र तरीही खर्गे पुढे बोलतच राहिले. हे मी म्हणत नाही, सरदार वल्लभभाई पटेल यांनी असं म्हंटल होते. आरएसएसशी संबंधित सर्व लोकांना आणि या देशाला माहित आहे की आरएसएसच्या लोकांनी गोडसेना उचकवून महात्मा गांधींची हत्या केली. मी शंभर वेळा सांगेन की आरएसएस आणि तुम्ही मिळून देशाचा नाश करत आहात असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरएसएसवर घणाघात केला.