भाच्यावर चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या मामास न्यायालयाने सुनावली शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधले

भाच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या नराधम मामा संभाजी चंदर नाईक याला जिल्हा न्यायाधीश श्री.पेरमपल्ली यांनी आज ११ महिने शिक्षा आणि १ हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल कुलकर्णी यांनी काम पहिले. याबाबत लखन सुंगारे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदरची घटना हि ७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाघमारे वस्तीवर असणाऱ्या शेतात घडली होती. यातील फिर्यादी लखन हा त्याची आई आणि भाऊ रवी याच्यासह त्याचे मामा संभाजी याच्या शेतात झोपडी घालून राहत होते आणि त्याच्याच शेतात काम करीत होते. संभाजीला दारूचे व्यसन होते. घटनेच्यादिवशी संभाजी हा दारू पिऊन लखनच्या झोपडीत रात्री येऊन तू गव्हाचे पीक काढण्यास केंव्हा जाणार आहेस असे म्हणून लखन, त्याची आई आणि भावास मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. लखन त्यास समजावून सांगत असताना तू मला समजावून सांगणारा कोण, मी येथून जाणार नाही असे म्हणत त्याचवेळी संभाजीने त्याच्या हातातील चाकूने रवीच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. लखन त्याला अडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने लखनच्या दंडावर चाकू मारला व तो पळून गेला.

त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने रवी व लखन यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी लखन याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा तपास मिरज ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी केला. घटनास्थळास भेट देऊन पंचनामा करण्यात आला.

Leave a Comment