ममता बँनर्जींचा पराभव कि विजयी? तृणमूल काँग्रेस म्हणतंय अफवा पसरवू नका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला अशा बातम्या येत असून, ‘ही चुकीची माहीती आहे. सद्ध्या मतमोजणी सुरू असून कोणीही अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका’. असे तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून सांगण्यात आले आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मतमोजणीमध्ये आघाडी घेतली असून, त्यांना बहुमत प्राप्त झाले आहे. भाजपचे सरकार बनवण्याचे स्वप्न यामुळे तुटले. व ममता यांचे सरकार बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव होईल असे बोलले जात होते. मात्र नंदिग्राम मध्ये ममता बॅनर्जी या सुरवातीपासूनच पिछाडीवर होत्या. सुवेंदु अधिकारी हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

You might also like