Wednesday, February 8, 2023

पंतप्रधान मोदींनी केले ममता दिदिंचे अभिनंदन; म्हणाले..

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज होते. या निकालामध्ये पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार बनेल हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच, केंद्र सरकार कडून पश्चिम बंगाल सरकारला नेहमीच शक्य ती मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून असे म्हटले आहे की, ‘पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील विजयासाठी तृणमुल काँग्रेस व ममता दीदी यांचे अभिनंदन. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि तृणमूल काँग्रेसने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून जी मदत लागेल ती यापुढेही केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला देईन. यासोबतच covid-19 च्या माहामारीमधून बाहेर पडण्यासाठीही केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला शक्य ती मदत पुरवेल’.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या निवडणुका घोषित झाल्यापासूनच भाजपमधील प्रमुख नेते आणि स्वतः पंतप्रधान यांनीही पश्चिम बंगालमधील निवडणुका अतिशय गांभीर्याने घेऊन वैयक्तिक पातळीवरती प्रचार सभा आणि प्रचार मोहीम हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालची निवडणूक खूप प्रतिष्ठेची झाली होती.