हा तर भाजपचा रडीचा डाव; ममता बँनर्जींच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहिर झाले. यामध्ये त्रिणमूल काँग्रेसने भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ममता बँनर्जी यांच्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. हा तर रडीचा डाव असल्याचं पवार यांनी म्हटलंय.

200 हून अधिक जागांवर त्रिणमुल काँग्रेस विजयी झाले आहे. मात्र नंदीग्राम येथून ममता बँनर्जींचा पराभव झाल्याचे समजत आहे. प्रथम विजय अन् नंतर पराभवाच्या बातम्या आल्याने अनेकजणांनी यावर आक्षेप घेतला आहे. ममतांच्या पक्षाने याबाबत फेरमोजणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण याविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही म्हटलंय.

यावर बोलताना, “रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल!” असं शरद पवार म्हणलेत.

You might also like