Tuesday, June 6, 2023

मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्…

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वसमत याठिकाणी मैत्रीला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या मित्राच्या बहिणीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर हि घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विश्वनाथ आंबादास लासिनकर असे आहे. आरोपीची वसमत शहरातील सोमवार पेठेत राहणाऱ्या एका तरुणासोबत चांगली मैत्री जमली होती. पण मागील काही दिवसांपासून विश्वनाथचा आपल्या मित्राच्या बहिणीवर डोळा होता. त्याने मित्राच्या बहिणीला लग्नाचे आमिषही दाखवले होते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी विश्वनाथ मित्राच्या घरी आला होता. यावेळी त्याने मित्राच्या विधवा बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील इतर कुटुंब मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी आरोपी विश्वनाथला अतिप्रसंग करताना रंगेहाथ पकडले.

पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याच्या रागातून आरोपीने घरातील टेबल, खुर्च्या, कपाट व इतर साहित्याची तोडफोड केली आणि त्या ठिकाणाहून पळून गेला. ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने आपल्या कुटुंबीयांसोबत वसमत पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली. पीडित तरुणीच्या पतीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे ती आपल्या भावाच्या घरी राहत होती. पीडितेच्या तक्रारीनंतर वसमत पोलिसांनी आरोपीविरुद्ध रितसर तक्रार दाखल करून अवघ्या काही तासांमध्ये आरोपी विश्वनाथ लासिनकरला अटक केली आहे. वसमत पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.