म्हणुन त्याने चक्क हत्तीलाच खाद्यावर उचललं! जाणुन घ्या कोण आहे हा बाहुबली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | हत्तीला खांद्यावर घेऊन चालणार्‍या एका माणसाचा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होतो आहे. चक्क हत्तीला खांद्यावर घेणारा हा बहुबली कोण आहे असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला आहे. ही घटना नक्की कोठे घडली? हत्तीला असं खांद्यावर का घेण्यात आलं? हा फोटो कधीचा आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला त्याअनुशंगाने खालील माहिती मिळाली.

आयएफएस अधिकारी दीपिका बाजपाई यांनी सर्वात आधी हा फोटो ट्विट केला होता. त्यात त्यांनी हत्तीच्या पिलाचं रेस्क्यू आॅपरेशन दरम्यानचा हा फोटो असून पलानिचामी नावाच्या तमिळनाडू वनविभागाच्या गार्डने त्या हत्तीच्या पिलाला उचललं असल्याचं म्हटलं आहे. ही घटना २०१७ साली तामिळनाडूच्या मेट्टुपलायम येथे घडली होती. हत्तीला खांद्यावर घेतलेल्या माणसाचं नाव ‘पलानिचामी’ आहे. पलानिचामी हे फोरेस्ट गार्ड नसून प्राणीमित्र आहेत.

२०१७ साली वनविभागाला माहिती मिळाली की एक हत्तीण सामान्य नागरिकांवर आणि वाहनांवर हल्ला करत आहे. वनविभागाने हत्तीणीला रोखण्याचा प्रयत्न केला पण ती सर्वांच्या अंगावर येत होती. तेव्हा वनविभागाच्या लक्षात आलं की हत्तीण चिखलात अडकलेल्या आपल्या पिल्लाचं रक्षण करत आहे. दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने पलानिचामी यांनी स्वतः चिखलात उतरून पिल्लाचा जीव वाचवला. यासाठी त्यांनी स्वतः पिल्लाला आपल्या खांद्यावर उचललं. पिलाला चिखलातून बाहेर आणताना पलानिचामी यांचा एका पत्रकाराने फोटो काढला. आयएफएस अधिकारी बाजपाई यांनी सदर फोटो सहज ट्विट केला. त्यानंतर हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. सोशल मिडियात या खर्‍याखुर्‍या बाहुबलीचं आता चांगलंच कौतुक होत आहे. चिखलातून बाहेर काढल्यानंतर पिल्लाची आणि त्याच्या आईची भेट घालून देण्यात आली. हे ज्यांच्यामुळे झालं त्या सुरक्षारक्षक पलानिचामी यांच्या हिमतीची दाद द्यायला हवी.

Leave a Comment