व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता बाइक; स्टंट पाहून तुम्ही थक्क व्हाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोकांना स्टंट (stunt) करण्याची आवड असते. याच स्टंटच्या (stunt) नादात अनेक लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागतो. सध्या अशाच एका स्टंटचा (stunt) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्टंट करणारा व्यक्ती हँडल न धरता रस्त्याच्या मधोमध बाइक चालवताना दिसत आहे. The Talon या नावाच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो खूपच आश्चर्यकारक आहे. याचं कारण म्हणजे व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने रस्त्यावर दुचाकीसह धोकादायक स्टंट केला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की या व्यक्तीचा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. मात्र सुदैवाने तो कोणत्याही अपघाताला बळी पडलेला दिसत नाही, परंतु तरी त्याने केलेला स्टंट (stunt) अत्यंत धक्कादायक आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खूप जड दिसणारी बाईक चालवताना दिसत आहे. तो अगदी आरामात हँडलवरून हात काढतोय आणि मग बाईकवर मागे झुकतोय. बाईक इतकी जड आहे की ती स्थिर चाललेली आहे. मध्येच तो बाईकवर पूर्णपणे झोपलेला दिसतो. त्याच्या शेजारुन इतर गाड्या जाताना दिसत आहेत.

या व्हिडिओवर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की, या व्यक्तीला बाईक चालवताना पाहून समजतं की त्याला दुचाकी कशी चालवायची हे खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटलं की अशा लोकांवर गाडी चालवण्यास बंदी घातली पाहिजे. हा बाईक स्टंट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन, RBI ने वाढवली मर्यादा

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज !!!

IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

खुशखबर !!! Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही करता येणार पेमेंट