व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईच्या चालत्या लोकल ट्रेनमध्ये चैन स्नॅचिंग (Chain snatching) करणाऱ्या चोरट्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा अल्पवयीन असून त्याला गोरेगाव परिसरातून अटक केली आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाची चैन स्नॅचिंग (Chain snatching) करुन हा चोरटा पळून गेला होता. गोरेगाव रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही हा चोरटा कैद झाला होता. या प्रकरणी पीडित व्यक्तीने बोरिवली जीआरपी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर बोरिवली जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

प्लॅटफॉर्मवर उभा राहून करायचा रेकी
गोरेगाव रेल्वे स्टेशनवर 31 मे 2022 रोजी पहाटे 5.18 मिनिटांनी सदर प्रवासी प्रवास करत होते. यावेळी ट्रेन सुरु झाल्यानंतर या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून (Chain snatching) पळून गेला. मात्र तो पळून जात असतानाच रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी बोरिवली जीआरपी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत, त्याआधारे चोरट्याचा शोध सुरु केला. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे गोरेगाव परिसरातून या चोरट्याला अटक करण्यात आली. हा चोरटा आधी प्लॅटफॉर्मवर उभा राहून रेकी करायचा. यानंतर तो आपले लक्ष्य हेरून चालत्या ट्रेनमधून चैन स्नॅचिंग (Chain snatching) करुन पळून जायचा. या गुन्ह्यात आरोपीबरोबर त्याचा आणखी कुणी साथीदार आहे का ? यासंदर्भात अधिक तपास बोरिवली पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

पैगंबर वादाचे पडसाद; अल- कायदाची मुंबई- दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची धमकी

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू