व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी (IND vs SA T20) टीम इंडियाला दोन धक्के बसले आहेत. कर्णधार केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे या सीरिजमधून (IND vs SA T20)  बाहेर झाले आहेत. केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे, तर नेटमध्ये बॅटिंग करत असताना कुलदीप यादवच्या उजव्या हाताला बॉल लागून त्याला दुखापत झाली आहे. केएल राहुलच्या गैरहजेरीत ऋषभ पंतला टीम इंडियाचं कर्णधारपद दिले आहे तर हार्दिक पांड्याला या सीरिजसाठी (IND vs SA T20)  उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

केएल राहुल आणि कुलदीप यादव यांच्या बदली खेळाडूची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. हे दोन्ही क्रिकेटपटू आता एनसीएमध्ये जाणार आहेत. तिकडेच त्यांच्या दुखापतीवर उपचार केले जातील, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. केएल राहुलप्रमाणेच कुलदीप यादवही आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. कुलदीपने 14 सामन्यांमध्ये 19.95 च्या सरासरीने आणि 8.43 च्या इकोनॉमी रेटने 21 विकेट घेतल्या. आयपीएलच्या या मोसमात कुलदीप दिल्ली कॅपिटल्सचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी (IND vs SA T20) भारतीय टीम
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

हे पण वाचा :
महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवारांनी केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

पैगंबर वादाचे पडसाद; अल- कायदाची मुंबई- दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची धमकी

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला चिमुकला; जवानांनी वाचवला जीव

‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड

Sarfaraz Khan ने रचला इतिहास, ब्रॅडमननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू