दोन बायका असतानाही अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले; आरोपीची माहिती देणाऱ्यास २१ हजारांचे बक्षीस

औरंगाबाद : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका ३८ वर्षीय आरोपीने मुलीला फूस लावून पळून लावले. मुलीला पळवून लावणाऱ्या आरोपीची माहिती देणाऱ्यास एकवीस हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदर आरोपीची कुठलीही माहिती असल्यास ग्रामीण पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पंडित इंगळे यांनी केले आहे.

आरोपी दोन बायकांचा दादला असूनही त्याने पळशी येथील अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तीन महिन्यांपूर्वी फसवले, आणि त्यानंतर तिला फूस लावून पळवून नेले. याघटने प्रकरणी आरोपीविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, बापू सुभाष काळे (३८,रा.पीरोळ,ह.मु.सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. मुलगी तिच्या नातेवाईकांकडे काही दिवस राहत होती, आरोपी तिच्या नातेवाईकांच्या घराशेजारी राहत होता. याच दरम्यान आरोपीची ओळख मुलीशी झाली. या ओळखीचा फायदा घेत मुलीला आरोपीने फूस लावून पळवून नेले. आरोपीविरोधात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीचा शोध सुरू असतानाही यश मिळत नसल्याने मुलीच्या वडिलांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास २१ हजारांचे बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपीला दोन बायका असून, त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे, शिवाय आरोपी संभाजी ब्रिगेड पक्षाचा शहराध्यक्ष होता. त्याच्या अशा वर्तनामुळेच त्याला पदावरून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे

You might also like