वाळूज येथून तीन महिला बेपत्ता

औरंगाबाद : वाळुज महानगरातून दोन दिवसात तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत. वडगावातून 22 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमायडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली आहे. पूजा अमोल टोम्पे, वय 22 (रा. गंगोत्री पार्क), वडगाव ही बुधवारी सकाळी पती कामाला गेल्यावर घरातून निघून गेली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर घर मालकीणनीने अमोल टोम्पे यांना ही माहिती दिली. सगळीकडे शोध घेऊनही पत्नी मिळून आल्याने यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. रांजणगाव शेणपुंजी तेथून 23 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. सुमैया जहिरोद्दीन, शेख 23 (रा. रंजनगांव) ही महिला 21 रोजी दुपारी 4 वाजता घराबाहेर पडली होती. ती घरी न परतल्याने तिच्या पतीने सगळीकडे तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून न आल्याने जहीरोउद्दीन शेख यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

रांजणगावातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी एमायडीसी वाळूज ठाण्यात दिली आहे. स्वाती सेहतलाल सोनी ही गुरुवारी सकाळी 10 वाजता घराबाहेर पडली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.

You might also like