कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून

0
37
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी

तालुक्यातील चोरे येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवार, २० मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शशिकला आनंदा सातपुते  (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आनंदा दादू सातपुते (वय ५५) असे संशयित पतीचे नाव आहे.

आनंदा सातपुते व त्याची पत्नी शशिकला यांचे किरकोळ कारणावरून वारंवार भांडण होत होती.
आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आनंदा सातपुते याने राहत्या घरी दारूच्या नशेत  पत्नी शशिकला झोपलेली असताना तीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून  खून केला. खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही.याप्रकरणी पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here