कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे नैराश्यातून वृद्धाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका रुग्णाने कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आत्महत्या केली आहे. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्या रुग्णाला अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली.

प्रकाश विष्णूपंत भगत असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ६५ वर्षांचे होते. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्यांना घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना कोरोना तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर प्रकाश यांनी काल रात्री राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेची भिगवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी नागरिकांनी कोरोनाबद्दल भीती न बाळगता त्वरित तपासणी करून योग्य ते उपचार घ्यावेत असे आवाहन केले.

Leave a Comment