हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात कधी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. स्टंट करणाऱ्यांची संख्या जगात काही कमी नाही . अशातच एक माणसाने तर कमालच केली. या व्यक्तीने JCB ने पाठ खाजवून घेतली आणि जगाला हे दाखवून दिलं की, भारतीय लोक जुगाडाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. हा फेसबुक व्हिडीओ Abdul Nasar नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.या व्हिडीओला आतापर्यंत ४ हजारांपेक्षा लाइक्स मिळाले आहेत सोबतच हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअरही करण्यात आला.
या तुम्ही बघू शकता की, एका वृद्ध व्यक्ती आपल्या दुपट्ट्याच्या मदतीने पाठ खाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशात अचानक ते बाजूला उभे असलेल्या जेसीबी मशीनच्या पंजाजवळ जातात. मशीन चालवणारा व्यक्ती जेसीबीच्या पंजाने या माणसाची पाठ खाजवून देतो.
https://www.facebook.com/abdulnasar.in/videos/257727322285477/
या व्हिडीओच्या शेवटी हे दिसून येतं की हा व्हिडीओ फक्त गंमतीसाठी तयार करण्यात आलाय. हा कारनामा पाहून सोशल मीडियावरील लोक हैराणही झालेत आणि त्यांना हसूही येत आहे. काही यूजर्सनी लिहिले की, हा स्टंट फारच धोकादायक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’