हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जन्म दाखल्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील नव्या सदस्याबरोबर आई वडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती भरणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी जन्म दाखल्यामध्ये (Birth Certificate) कुटुंबाच्या धर्माविषयीची माहिती नोंदवण्यात येत नव्हती. परंतु, आता या नोंदणी प्रक्रियेत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे धर्माविषयीची माहिती नोंदवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आणलेल्या नवीन नियमानुसार, नोंदणी अर्ज क्रमांक 1 मध्ये आणखीन एक कॉलम जोडण्यात आला आहे. या कॉलममध्ये लहान आई-वडिलांचा संबंधी माहिती देणे बंधनकारक असणार आहे. दत्तक घेण्याच्या प्रक्रियेकरता फॉर्म क्रमांक-1 त्यांचा महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे, गेल्याच वर्षी केंद्र सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार जन्म मृत्यूची नोंद अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच जन्म दाखल्याच्या फॉर्ममध्ये धर्माविषयी माहिती देणे बंधनकारक असणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुढील काळामध्ये या माहितीचा विविध सरकारी योजना विविध ओळखपत्रांसाठी वापर करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. तुम्ही जी माहिती जन्म दाखल्याच्या फॉर्म क्रमांक – 1 एक मध्ये भराल त्याच माहितीचा पुढे विविध सेवांसाठी वापर केला जाईल. तसेच अनेक कागदपत्रांसाठी देखील या माहितीचा वापर केला जाईल. यामुळे तुम्हाला सतत दहा वेळा वेगवेगळे दस्तऐवज देण्याचे गरज पडणार नाही. तसेच लहान मुलांच्या जन्माची माहिती देखील डिजिटल सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट जतन करण्यात येईल.
दरम्यान, या नव्या पद्धतीमुळे मृत्यू प्रमाणपत्र काढायचे असल्यास संबंधित व्यक्तीच्या जन्माचे डिजिटल माहिती देखील आपोआप समोर येईल. त्याचबरोबर, बँकेचा तपशील पीएफ आणि विमा इतर माहिती देखील ऑनलाईन तपासता येईल. ही माहिती संबंधित विभागाला देखील पोहचवली जाईल. त्यामुळे प्रशासनासह नातेवाईकांचा देखील वेळ वाचेल.