औरंगाबाद – मागील काही दिवसांपासुन शहरात मंगल सूत्र चोरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. काल पुन्हा आजारी मुलीला स्कुटी वरून रुग्णालयात घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्याने पाठीमागे बसलेल्या मुलीच्या गळ्यातील मानिमंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सिडकोतील लाईफलाईन हॉस्पिटल समोर घडली. या घटनेमुळे पोलीस प्रशासन मंगळसूत्र चोरी रोखण्यात असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
याविषयी अधिक वृत्त असे कि, महावीर बाबुराव रणदिवे वय- 65 (त्रिवेणी नगर, सिडको) यांची मुलगी आजारी असल्याने तिला घेऊन ते (एम एच 20 बी के 3224) या क्रमांकाच्या स्कुटीवरून घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुत रुग्णालयाकडे निघाले होते. दरम्यान जलनारोड धुत रुग्णालयाकडे जात असताना लाईफ लाईन रुग्णालय समोर येताच दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले व काही कळण्याच्या आत त्यांनी पाठीमागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मानिमंगळ हिसकावले व पसार झाले.
रात्री उशिरा दोन वाजेच्या दरम्यान या प्रकरणी एमआयडिसी सिडको पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास साह्ययक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत.