ठाकरे-पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; मनोज जरांगेचं आव्हान

jarange patil on thackeray pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या विरोधी पक्षातील नेत्यानी आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही हे त्यांनी सांगावं असं आव्हान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिले आहे. विरोधक जर मराठा आरक्षणाबाबत (Maratha Aarakshan) आपली भूमिका स्पष्ट करत करतील तर सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा ,वाट पाहू नये असेही जरांगे पाटलांनी म्हंटल आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले याना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. आता जरांगे पाटलांनीही फडणवीसांच्या सुरात सूर मिसळला आहे.

आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे. आपल्या समाजाला मोठं करायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं मनोज जरांगे पाटीलांनी म्हंटल. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा ,विरोधकांची वाट पाहू नयेत, असे मत जरांगे पाटील यांनी मांडले. जरांगे पाटलांच्या या आव्हानानंतर विरोधक कोंडीत पकडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना मात्र बळ मिळेल असं बोललं जातंय.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील मंगळ काही दिवसांपासून भाजप नेत्यांना थेट अंगावर घेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी तिखट शब्दात सडकून टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही, मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठापुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करीअर मराठा संपवून टाकेल, असा इशारा जरांगे पाटलांनी भाजपला दिला.